
नागपूर : बनावट सोने तारण ठेवून कर्ज ठेवण्याच्या नावाने शिक्षक सहकारी बॅंकेची ७४ लाखांनी फसवणूक करणाऱ्या ठकबाज आरोपी अनिल उरकुडे (वय ५९) याने आपल्या १६ नातेवाईकांसह मित्रांना बॅंकेतून कर्ज मिळवून दिले. याप्रकरणी त्याच्यासह नातेवाईकांवर पाचपावली, धंतोली आणि सक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.