
नागपूर : एखादी कला पिढीजात असली की येणारी पिढी कला आत्मसात करते असे म्हणतात. मात्र, कला अंगी असली की ती पिढीजातच असणे आवश्यक नाही, हे वैभवने त्याच्या कलेतून दाखवून दिले आहे. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक. एका खोलीच्या घरात राहत अंगभूत कलेच्या जोरावर सर्व शक्य आहे, हे त्याने दाखवून दिले आहे.