
अखिलेश गणवीर
नागपूर : सातवीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. नंतर आर्थिक परिस्थितीमुळे इंग्रजी माध्यम सोडावे लागले. सातवीत नाइलाजाने मराठी माध्यम स्वीकारावे लागले. आर्थिक संकटे आली तरी रियाला ज्ञानाची भूक अस्वस्थ बसू देत नव्हती. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिने दहावीच्या परीक्षेत ८९.८० टक्के गुण घेत आई-वडील आणि शिक्षकांचा विश्वास जिंकला.