Gondia News: सैनिकांचे गाव बघायला या कातुर्लीला; अडीचशे लोकवस्तीच्या गावात घडले ३९ सैनिक
soldier village of india: गोंदियातील कातुर्ली या छोट्याशा गावात आतापर्यंत ३९ सैनिक देशसेवेसाठी रुजू झाले आहेत. तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी गावात मोफत प्रशिक्षण दिले जाते.
गोंदिया : देशसेवेसाठी सैनिक घडविणारे गाव बघायचे असेल तर एकदा कातुर्लीला जरूर जा. अंदाजे अडीचशे लोकवस्तीच्या या गावाने आतापर्यंत ३९ सैनिक देशसेवेसाठी दिले आहेत. तर आणखी काही सैनिक घडत आहेत.