Success Story: वृत्तपत्र विक्रेता बुद्धांशुची उत्तुंग भरारीप्रतिकूल परिस्थितीतही दहावीत ७२ टक्के गुण
Student Success : गरिबीच्या गर्तेत असताना सकाळी वृत्तपत्रे वाटप, दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास करत बुद्धांशु बारमासे याने ७२ टक्के गुण मिळवत दहावी उत्तीर्ण केली. त्याचे हे यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे.
नागपूर : गरिबीच्या गर्तेत पिचलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी बुद्धांशु संजय बारमासे एक प्रेरणास्रोत ठरला. जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेच्या या विद्यार्थ्याने आर्थिक अडचणींवर मात करत दहावीच्या परीक्षेत तब्बल ७२ टक्के गुण मिळविले.