Hemalkasa Students MBBS Achievement
esakal
गडचिरोली : कधीकाळी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम गावांत रानपाखरांसारखी जगणारी मुले उच्च शिक्षणाचे स्वप्नसुद्धा पाहू शकत नव्हती. पण ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी निर्माण केलेल्या ‘लोकबिरादरी’ नावाच्या घरट्याने या मुलांच्या पंखांना बळ दिले. हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पातील आश्रमशाळेद्वारे चालविण्यात येणाऱ्या ‘लोकसाधना सेंटर फॉर एक्सलन्स इन हायर स्टडीज’ या उपक्रमातील आठ विद्यार्थ्यांनी ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवीत मोठे यश संपादन केले आहे.