

Gadchiroli News
esakal
गडचिरोली: जिल्ह्यातील दक्षिण भागातील अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत खरेदी केलेल्या धानाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तब्बल २ लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल झाली नसल्याने उघड्यावर असलेले हे धान सडत आहेत. एकीकडे धान्याच्या किमती गगनाला भिडत असताना, सर्वसामान्य, गोरगरीबांना अन्न मिळत नसताना लाखो क्विंटल धान संबंधित विभागाच्या दुर्लक्षमुळे खराब होत आहे.