
नागपूर : शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये ओसीडब्ल्यूने (ऑरेंज सिटी वॉटर्स) एक महिन्याच्या आत सुधारणा करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना खडसावले. याच बैठकीत त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवरही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.