

नागपूर : शहरात गेल्या काही महिन्यांपासून गॅंगवार भडकले असून त्यातून कुख्यात गुंडांच्या खुनांचे सत्र सुरू झाले आहे. सक्करदरा परिसरात ही घटना रविवारी (ता.१६) मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. एका महिन्यापूर्वी कारागृहातून सुटून आलेला कुख्यात गुंड कार्तिक उमेश चौबे (वय २८, रा. सोमवारी क्वार्टर) याच्यावर शाहू गार्डनजवळ तिघांनी चाकूने वार करीत त्याला ठार केले. याप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.