esakal | गॅंगस्टर रणजित सफेलकरच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी नागरिकांना केले तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन

बोलून बातमी शोधा

Gangster Ranjit Safelkars difficulty increases Nagpur crime news

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रणजित हा श्रीराम सेनेचे गुंड घेऊन रवी यांच्या दुकानात पोहोचला. कुख्यात गुंड राकेश काळे, अजय चिन्नौर, चेतन कडू व अन्य पाच युवकांनी रवीला ठार मारण्याची धमकी दिली आणि दोन्ही दुकानांचा ताबा घेतला. दुकानांची साफसफाई करून रंगरंगोटी केली. ओम साई लँड डेव्हलपर्सचा फलक लावला.

गॅंगस्टर रणजित सफेलकरच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी नागरिकांना केले तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड आणि कुख्यात मनीष श्रीवास हत्याकांडाचा मास्टरमाईंड रणजित सफेलकर याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एका दुकानदाराला रणजितने श्रीराम सेनेचे गुंड नेऊन ठार मारण्याची धमकी देऊन दोन दुकाने हडपली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी रणजित आणि त्याच्या गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मार्च २०१६ रोजी रवी राजू डिकोंडवार (३२) यांनी मुजफ्फर हुसेन यांच्याकडून कळमना हद्दीतील भूखंड विकत घेतला. त्यावर चार गाळ्यांचे दुकान बांधले. काही दिवसांनी रणजितने रवी यांनी कामठी येथील कार्यालयात बोलावून चारपैकी दोन दुकाने देण्याची धमकी देत तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा - निमगडे हत्याकांड : पाच कोटींची सुपारी देणारा कोण? राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याची शक्यता

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रणजित हा श्रीराम सेनेचे गुंड घेऊन रवी यांच्या दुकानात पोहोचला. कुख्यात गुंड राकेश काळे, अजय चिन्नौर, चेतन कडू व अन्य पाच युवकांनी रवीला ठार मारण्याची धमकी दिली आणि दोन्ही दुकानांचा ताबा घेतला. दुकानांची साफसफाई करून रंगरंगोटी केली. ओम साई लँड डेव्हलपर्सचा फलक लावला.

अन् मिळाली हिंमत

पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन शिवलिंग राजमाने यांनी नुकताच रणजित सफेलकरला मनीष श्रीवास हत्याकांडात अटक केली. तसेच सामान्य गुंडासारखी त्याची पायी वरात काढली. त्यामुळे पीडित रवी डिकोंडवार यांना हिंमत आली. या प्रकरणी रवीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी सफेलकर, राकेश काळे, अजय चिन्नौर, संजय कारोंडे आणि अन्य पाच साथीदारांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाची बातमी - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज

इतरही लोकांची फसवणूक

सफेलकरने श्रीराम सेनेच्या गुंडाचा वापर करून अनेक भूखंड हडपले किंवा घर, दुकानांवर ताबा घेतल्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीमुळे विरोधात तक्रार करण्यात आली नाही. आरोपींनी अशाचप्रकारे इतरही लोकांची फसवणूक करून गुन्हे केले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता रणजित व त्याच्या साथीदारांविरोधात तक्रारी देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार, डीसीपी गजानन राजमाने यांनी केले आहे.