esakal | नागपूरात दिवसाढवळ्या गॅंगवार!
sakal

बोलून बातमी शोधा

crime

गेल्या चोवीस तासांतील हे दुसरे हत्याकांड असून कायदा व सुव्यवस्थेवर त्यामुळे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूरात दिवसाढवळ्या गॅंगवार!

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : उपराजधानीतील सर्वात मोठा जुगार अड्डा संचालक बाल्या उर्फ किशोर बिनेकर याचा ५ ते ६ आरोपींनी पाठलाग करून कारमधून खेचून धारदार शस्त्रांनी खून केला. ही थरारक घटना आज दुपारी चार वाजता बोले पेट्रोल पंपासमोर घडली.
गेल्या चोवीस तासांतील हे दुसरे हत्याकांड असून कायदा व सुव्यवस्थेवर त्यामुळे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी बाल्या हा काळ्या रंगाच्या कारने जात होता. बोले पेट्रोलपंपाजवळ सिग्नल लागल्याने त्याने कार थांबवली. याच वेळी मोपेड व बुलेटवर पाच जण आले. त्यांनी बाल्याला कारमधून बाहेर काढले. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात बाल्या खाली पडला. बाल्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटताना मारेकरी मोपेड व बुलेटने वेगवेगळ्या दिशेने पसार झाले.

सविस्तर वाचा - धक्कादायक! महिला बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी बाल्याचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. बाल्याच्या हत्येप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top