नागपूर - हिंगणा शहरातील भोसलेवाडी परिसरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील गौरव पांडुरंग इंगळे याने आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निश्चित केले असून, लंडनमधील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ वॉरिकच्या ‘सेफ ऑटोनॉमी रिसर्च ग्रुप’मध्ये ‘रोबोटिक ऑटोमॅटीक व्हेईकल प्रकल्पावर अभियंता म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. या कामासाठी तो नुकताच लंडनला रवाना झाला आहे.