
Turn Traditional Sarees into Chic Western Wear: कपाटात ठेवलेली आईची जुनी साडी आता फॅशन आयकॉन झालीये. खरे म्हणावे तर जुन्या साड्या त्यांच्या भावनिक आणि सांस्कृतिक मूल्यासाठी बहुमोल मानल्या जातात. आईच्या साडीचा तो गंध, रंग आणि तो स्पर्श हा प्रत्येक मुलासाठी स्पेशल असतो.
पूर्वी या साड्यांपासून केवळ सलवार, अनारकली किंवा लेहंगा शिवला जायचा. मात्र, आता ''जेन झी'' ला फक्त पारंपरिक नाही, तर थोडासा मिक्स-विक्स, मॉडर्न,फंकी आणि थोडा स्टायलिश लुक हवा असतो. या फॅशन मध्ये फक्त मुलीच नव्हे तर मुलेही पुढे आहेत.