

नागपूर : दोन वर्षाच्या प्रेम संबंधानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून केला. हे थरारक हत्याकांड आज बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एम्प्रेस मॉल परिसरात उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकरास अटक केली. मुजाहिद अंसारी (वय २०,रा. मोमीनपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर फरजाना (२०) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुजाहिद अन्सारी हा बजाजनगरातील एका गॅरेजमध्ये काम करतो.
त्याचे गड्डीगोदाम मधील फरजाना या युवतीशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते. पण फरजानाने कुटुंबियांचा विचार करता लग्नास नकार दिला होता,अशी चर्चा आहे.दुसरीकडे मुजाहिद मानायला तयार नव्हता. शेवटी कंटाळून फरजानाने संबंध तोडून टाकले. गेल्या दोन डिसेंबरला ‘मला तुझ्याशी काही बोलायचे असून शेवटचे एकदाचे भेटायचे आहे. यानंतर मी तुला कधीच त्रास देणार नाही.’ असे सांगितले. त्यामुळे फरजानाने त्याला शेवटी एकदाचे भेटण्याचे ठरविले. मुजाहिदने तिला एम्प्रेस मॉलच्या चौथ्या माळ्यावर नेले.
तेथे फरजानाचा दुपट्ट्याने गळा आवळून खून करीत पळ काढला. आज बुधवारी सायंकाळी चौथ्या माळ्यावरून दुर्गंध येत असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. गणेशपेठ पोलिस तेथे दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये रवाना केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.