esakal | मेहेंदीपेक्षा "टॅटू' ला पसंती 
sakal

बोलून बातमी शोधा

tattoo.jpg

मोजकेच पाहुण्यात आणि कमी वेळात लग्न सोहळे पार पडत असल्याने, आता मेहंदी ऐवजी लवकर चिटकरणाऱ्या टॅटू मेंहदीला तरुणी पसंती देत आहेत. 

मेहेंदीपेक्षा "टॅटू' ला पसंती 

sakal_logo
By
मनीषा मोहोड-येरखेडे

नागपूर  : तरुणाईला फॅशनचे मोठे वेड चित्रपटातील कलाकारांनी काहीही नवीन फॅशन केली की, तरुणाईला त्याचेच वेड लागते. हल्ली सिनेकलावंतांच्या अंगावर वेगवेगळे "टॅटू' दाखविले जात असल्याने तरुणांमध्ये टॅटूची फॅशन लोकप्रिय झाली आहे. युवकांसह युवतींचा देखील याकडे मोठ्या संख्येने कल दिसून येत आहे. समारंभासाठी मेहेंदीपेक्षा खास "टॅटू' ला पसंती दिली जात आहे. त्यामुळे टॅटू बनविण्याच्या कलाप्रकाराकडे आता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. 
कोरोना मुळे जिवनशैलीत मोठा बदल झाला असून, आता कुठलीही गोष्ट निश्‍चीत नसल्याची भावना प्रत्येकाला होऊ लागली आहे. लग्न सोहळेही मोजक्‍याच लोकांमध्ये व्हावे यासाठी दबाव आणला जात आहे. अशातच तरुणींनी मेहंदी ऐवजी टॅटूलाच पसंती दिली आहे. लग्न सोहळ्यात मेहंदीचा स्वतंत्र कार्यक्रम होत होता. आता मात्र, मोजकेच पाहुण्यात आणि कमी वेळात लग्न सोहळे पार पडत असल्याने, आता मेहंदी ऐवजी लवकर चिटकरणाऱ्या टॅटू मेंहदीला तरुणी पसंती देत आहेत. 

इन्संटट टॅटू कडे कल 
कायमस्वरूपी टॅटू काढण्यापेक्षा काही दिवसांपुरते टॅटू काढण्याकडे तरुणाईचा कल जास्त असून यात मुलींची आघाडी असते. असे असले तरी मुलांमध्येही हा ज्वर वाढताना दिसतो आहे. टॅटू शॉपमध्ये तरुणांचा वावर वाढला असून तरुणांच्या सोबतीने नोकरदार वर्गही यात मागे नसल्याचे कलाकारांनी सांगितले आहे. वाढदिवसाची पार्टी, साखरपुडा, लग्नसमारंभासह नवरात्रीमध्ये खासकरून कायमस्वरूपी टॅटू काढण्यापेक्षा काही दिवसांपूरती गोंदवून घेण्याकडे तरुणांचा कल जास्त आहे. नवरात्रीत व लग्नसमारंभात पाठीवर टॅटू काढण्यास मुलींचे जास्त प्राधान्य असते. त्यासाठी खास बॅकलेस घागरा आणि चोलीची फॅशन निवडण्यात येते. 

हे वाचा -  नकाे गं बाई... येथील मुलांसाेबत अाता लग्न नाही, िवदभार्तील उपवर मुलींचा िनश्चय 
 

नायकांच्या "टॅटू'ची क्रेझ 
टॅटूसाठी खर्च करण्यासाठी तरुणाई तयार असते. पाचशे रुपयांपासून तर पाच हजार रुपयांपर्यंत पैसे मोजण्यास तरुणाई मागे-पुढे पहात नाहीत. तात्पुरते टॅटू हे दीडशे रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत काढून मिळतात. तर कायमस्वरूपी टॅटू हे पाचशे रुपयांपासून ते हजारो रुपयांपुढे काढून मिळतात. टॅटूच्या आकारमानावर त्याचे पैसे ठरलेले असतात. मुलांमध्ये चित्रपटातील नायकांनी गोंदविलेल्या टॅटूची क्रेझ अधिक दिसून येते. 
 
रंगीबेरंगी टॅटूला पसंती 
फुलांचे रंगबिरंगी तर राधाकृष्णाचे, मोरपीसचे टॅटू शरीरावर रंगवून घेण्याची स्पर्धाही सध्या जोमाने सुरू आहे. मुली शक्‍यतो पाठ, पोट आणि दंडावर टॅटू काढण्यास पसंती देतात तर मुले छाती, दंड आणि मानेवर टॅटू काढतात. स्किन बेस तसेच फिगर बेस व रंगानुसार टॅटू प्रचलित आहेत. 

टॅटू करताना घ्या काळजी 
टॅटू ही फॅशन जरी असली तरी ते करताना सावधगिरी बाळगणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. टॅटू करताना विशिष्ट प्रकारची सुई वापरणे आवश्‍यक असते. एकासाठी वापरलेली सुई दुसऱ्याला वापरली तर टॅटूद्वारे गंभीर त्वचासंसर्गाबरोबरच हेपिटॅटिस बी-सी यांसारख्या विषाणूंचा संसर्ग होतो. उच्चभ्रूंप्रमाणेच फॅशन करण्याच्या हव्यासापोटी हलक्‍या प्रतीची, स्वस्तामधील सौंदर्य प्रसाधने वापरून टॅटू केल्याने त्वचेची अपरिमित हानी होते. त्यामुळे टॅटू करताना काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

टॅटूचे प्रोफेशनल शिक्षण 
टॅटू गोंदवणार्या कामाला आता व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. याचे प्रोफेशनल शिक्षण देखील दिले जाते. टॅटू करताना नागरीकांनी व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे तसेच तो करतानाही व्यवस्थित होतो आहे की नाही त्यासाठी वापरण्यात येणारी सुई वारंवार बदलवली जात आहे की नाही याची खात्री करावी. 
श्रुती चोरडीया, टॅटू आरटीस्ट, नागपूर.