कोरोनाबाधित पोलिसांच्या पाठीशी आता खुद्द नागपूरचे नवनियुक्त सीपी! वाचा काय केले वक्तव्य

amitesh kumar
amitesh kumar
Updated on

नागपूर :  पोलिस विभाग ही शहरात काम करणारी सर्वात महत्वाची संस्था आहे आणि या विभागातील आपल्याच सहकाऱ्यांना कोरोनाबाधित झाल्यानंतर जर उपचारासाठी ताटकळत रहावे लागत असेल, तर हे दुर्दैव आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला काही होऊ नये, याची नैतिक जबाबदारी आपली आहे. त्यामुळे सर्व पोलिस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी नैतिक जबाबदारी ओळखून आपल्या सहकाऱ्यांची उपचारासाठी धावपळ होणार नाही, याची काळची घ्यावी. तुम्ही हे करीत नसाल तर मी स्वतः महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत बोलेन, असे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार तीन उपायुक्त आणि चार पोलिस निरीक्षकांशी बोलताना म्हणाले.

त्यांच्या वायरलेसवरील या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यापुढे एकही पोलिस कोरोनाने मृत्यूमुखी पडता कामा नये, अशी भूमिका नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी घेतली आहे.

सामान्य नागरिकांप्रमाणे आता पोलिसांची देखील उपचारासाठी परवड होऊ लागली आहे. आधीच कोरोनाच्या बाधेने राज्यात शेकडो पोलिस मरण पावले आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व झोनच्या उपायुक्तांना कडक सूचना दिल्या आहेत. वायरलेसवरील संभाषणात आयुक्त म्हणतात, ज्या कोणत्या पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कोरोनाचा त्रास होत आहे, त्यांना रुग्णालयात बेड उपलब्ध झालेच पाहिजेत. ही व्यवस्था वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि उपायुक्तांनी करावी. काल शहरात चार पोलिस कोरोनाबाधित निघाले होते. त्यांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांनी थेट आयुक्तांनाच कॉल केला. आयुक्तांनी तत्काळ दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी त्यांनी काल दुपारी ४ वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. न झाल्यास स्वतः महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोलणार असल्याचे सांगितले.

पोलिसांसाठी नियोजित असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित पोलिसांना दाखल करण्यास प्राधान्य द्यावे. हे जर शक्य झाले नाही, तर त्यानंतर मेयो किंवा मेडिकल हॉस्पीटलचा विचार करावा आणि तेथेही शक्य न झाल्यास इतर रुग्णालयांचा विचार करावा. तेथेही त्यांच्यावर उपचाराचा आर्थिक बोजा पडू देऊ नये. पोलिस कल्याण निधीतून तो उपचाराचा खर्च करण्यात यावा. ही आपली जबाबदारी आहे, असेही आयुक्त अमितेशकमार म्हणाले. पोलिस विभातही कोरोना वेगाने पसरतोय. सामान्य जनतेप्रमाणे पोलिसांनीही कोरोनाचा धसका घेतलाय. कोरोनाबाधित पोलिसांचा विषय खुद्द आयुक्तांनीच हाती घेतला असल्यामुळे पोलिस विभागातून कोरोना कमी होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com