ग्लोबल वार्मिंगचा उपराजधानीला फटका

शहरवासीयांनी अनुभवलेला मार्च सर्वाधिक उष्ण
Global warming has hit Nagpur, the sub-capital of Maharashtra, India
Global warming has hit Nagpur, the sub-capital of Maharashtra, IndiaSakal
Updated on

नागपूर : ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव जगभर दिसत असताना नागपूर व विदर्भही त्यातून सुटू शकले नाहीत. बदलत्या निसर्गचक्रामुळे अवकाळी पाऊस व कडाक्याच्या थंडीसोबतच धरतीचे तापमानही वाढू लागले आहे. गेल्या पाच वर्षांतील नागपूरच्या तापमानाचा इतिहास बघितल्यास यंदाचा मार्च दुसरा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. भूतकाळातील आकडेवारी लक्षात घेतल्यास साधारणपणे विदर्भात मार्च महिन्यात दरवर्षी ४० अंशांच्या आसपास कमाल तापमान असते. मात्र यंदा आलेल्या तीव्र लाटेने नागपूरचा गेल्या तीन वर्षांतील उच्चांक मोडीत निघाला. प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरकरांसाठी यंदाचा मार्च गेल्या पाच वर्षांतील दुसरा उष्ण महिना राहिला. यापूर्वी २०१९ मध्ये ३१ मार्चला नागपूरचा पारा ४३.३ अंशांवर गेला होता. त्याखालोखाल ४२.१ तापमानाची नोंद गेल्या ३० मार्च रोजी करण्यात आली. त्यामुळे पाच वर्षांत नागपूर दुसऱ्यांदा ‘हॉट’ राहिले.

विदर्भातील एकूण उन्हाळ्याचा विचार केल्यास, नागपूरचे सर्वाधिक तापमान २२ मे २०१३ रोजी ४७.९ अंश सेल्सिअसवर गेले होते, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. त्याच वर्षी २२ मे रोजी चंद्रपूरचा पारा तब्बल ४८.२ डिग्रीवर गेला होता. विदर्भाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील तो सर्वात उष्ण दिवस ठरला होता. तज्ज्ञांच्या मते, वाढते तापमान हे बदलते निसर्गचक्र व ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. यावर्षी एप्रिल आणि मे मध्येही पारा सामान्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

वर्ष तारीख कमाल तापमान

  • २०२२ ३० मार्च ४२.१ अंश सेल्सिअस

  • २०२१ ३१ मार्च ४१.९ अंश सेल्सिअस

  • २०२० ३० मार्च ३७.६ अंश सेल्सिअस

  • २०१९ ३१ मार्च ४३.३ अंश सेल्सिअस

  • २०१८ ३१ मार्च ४१.० अंश सेल्सिअस

चंद्रपूर जगात सर्वाधिक

दरम्यान, विदर्भात उन्हाच्या लाटेचा प्रभाव सुरूच असून, शुक्रवारी चंद्रपूरच्या (४३.६ अंश सेल्सिअस) कमाल तापमानाने देशासह संपूर्ण जगात उच्चांकी झेप घेतली आहे. तशी नोंद जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या एल डोराडो या संकेतस्थळावर करण्यात आली. अकोल्यानेही (४३.१ अंश सेल्सिअस) जागतिक तापमानात पहिल्या अकरामध्ये स्थान मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com