esakal | अरे बापरे! सोन्याचे भाव गाठणार पन्नाशी? हे आहे कारण

बोलून बातमी शोधा

gold.

मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम सरासरी 450 रुपयांनी वाढ झाली. तर चांदीच्या दरातही किलोमागे जवळपास एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

अरे बापरे! सोन्याचे भाव गाठणार पन्नाशी? हे आहे कारण
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर :  चमकते ते नेहमीच सोने नसते असे म्हणतात. मात्र सोन्याच्या भावाची चमक एवढी वाढली आहे की सोने म्हटले तरी सामान्यांच्या डोळ्यासमोर तारे चमकतील, इतकी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीत इतिहासात पहिल्यांदाच एवढी वाढ झाली आहे. आणि सोने सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. आता 10 ग्रॅम सोन्यासाठी 43,170 रुपये मोजावे लागणार आहेत. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 700 रूपयांनी वाढला आहे.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 43 हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. लग्नसराईमुळे पुढील काही दिवसात सोन्याची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमती आणि लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा फटका देशांतर्गत सराफ बाजारातही पाहायला मिळतोय. त्यातच चीनमधील जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या मिभतीमुळे सोन्याचे भाव कडाडले आहेत.

 सविस्तर वाचा - प्याला तेरे नाम का पिया...वाचा नेमके काय


मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम सरासरी 450 रुपयांनी वाढ झाली. तर चांदीच्या दरातही किलोमागे जवळपास एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.


आठ दिवसांत दीड हजार रुपयांची वाढ
मागील आठ दिवसांत सोन्याच्या दरात जवळपास दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचे भावही वाढले आहेत.