Gold Rate : सोन्याचे दर जाणार चार हजार डॉलरवर; तज्ज्ञांनी वर्तवले भाकीत

कामाख्या गोल्ड आउटलूक २०२५ च्या तिसऱ्या आवृत्तीत सोन्याच्या किमतीबाबत अतिशय मनोरंजक आणि वैविध्यपूर्ण अंदाज व्यक्त करण्यात आले.
Bharat Sheth
Bharat Shethsakal
Updated on

नागपूर - कामाख्या गोल्ड आउटलूक २०२५ च्या तिसऱ्या आवृत्तीत सोन्याच्या किमतीबाबत अतिशय मनोरंजक आणि वैविध्यपूर्ण अंदाज व्यक्त करण्यात आले. मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या विशेष चर्चेत बुलियन ज्वेलरी आणि बँकिंग क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.

गोल्ड आउटलूकचे आयोजक आणि कामाख्या ज्वेल्सचे एमडी मनोज झा म्हणाले, जगात वाढलेल्या तणावामुळे सोन्याचे दर चार हजार डॉलर्सपर्यंत जाऊ शकतात. पण, तणाव कमी झाल्याची बातमी येताच सोन्याचे दर २७०० डॉलर्सपर्यंत घसरू शकतात.

बटुकभाई सन्स ज्वेलर्सचे वरिष्ठ तज्ज्ञ भरत सेठ यांनी सांगितले की, सोने खरेदीचे दिवस असल्याने आता सोन्याला भाव आहे. त्यामुळे सोने सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रचंड मागणी आहे. डॉलरमधील कमकुवतपणा आणि जगभरातील अनिश्चितता या तेजीला चालना देत आहेत.

मोतीलाल ओसवालचे किशोर नार्ने यांचा विश्वास आहे की, बाजारात घसरण झाली तरी ती टिकाऊ राहणार नाही. ट्रम्पच्या धोरणांमुळे अमेरिकन डॉलरची विश्वासार्हता प्रभावित झाली आहे आणि अशा परिस्थितीत सोन्याचा दर चार हजार डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

निर्मल बंगचे कुणाल शाह म्हणाले, अल्पावधीत २९५० डॉलरपर्यंत सुधारणा होण्याची शक्यता आहे; परंतु त्यानंतर मजबूत पुनर्प्राप्तीसह किमती ३४००-३४५० डॉलरपर्यंत परत येऊ शकतात.

केडिया अ‍ॅडव्हायझरीचे अजय केडिया यांनी सांगितले की, २०२५ चे पहिले सहा महिने सोन्यासाठी सकारात्मक असू शकतात. सोन्याच्या किमती ३६०० डॉलरपर्यंत जाऊ शकतात. मात्र, दुसऱ्या सहामाहीत २३५० डॉलरपर्यंत घसरण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com