नागपूर : मदतीच्या बहाण्याने अनेकदा अनेकांकडून बलात्कार; अमानवी कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

नागपूर : मदतीच्या बहाण्याने अनेकदा अनेकांकडून बलात्कार; अमानवी कृत्य

गोंदिया : घरगुती वादातून माहेरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात आरोपींना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गोरेगाव पोलिसांनी आरोपींना आज, शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित महिला ही गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून, ती ३० जुलै रोजी घरगुती वादातून एकटीच माहेरी जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान,

श्रीराम उरकुडे (वय ४५, रा. गोरेगाव) याने तिच्यावर बलात्कार केला. ३१ जुलै रोजी पळसगाव रस्त्यालगत त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला व तिला जंगलात सोडून दिले. यानंतर दोघांनीही तिला शेतात नेले व तिच्यावर बलात्कार केला. ती भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कन्हाळमोह येथे बेशुद्ध अवस्थेत पडून होती.

Web Title: Gondia Atrocities Case Gang Rape Accused Police Custody

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top