Gondia accident six people killed seven injured
esakal
गोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागराजवळ ट्रकने पीकअप वाहनाला दिलेल्या धडकेत पीकअपमधील सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये एका तीन वर्षीय बालकाचाही समावेश आहे. ही घटना सोमवारी (ता. ७) मध्यरात्री बाराच्या सुमारास (Nagara Gondia truck pickup accident) घडली. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.