
नागपूर : नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांमुळे गोंदियातून सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरपर्यंत रोजच हाऊसफूल असते. यात बसायला सोडा पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. या गाडीचे स्लिपरचे पूर्ण डबे नागपूरपर्यंत लोकल केल्यास दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.