म्युकरमायकोसिसच्या काळातही रुग्णांकडे दुर्लक्ष, दोन दिवस रुग्ण सहन करत होता वेदना

black fungus
black funguse sakal

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) (government medical college nagpur) दाखल असलेल्या बुरशीच्या (mucormycosis) रुग्णांना दातांशी संबंधित त्रास असल्यास तत्काळ शासकीय दंत रुग्णालयातील (government dental college and hospital nagpur) डॉक्टरांना तपासणीसाठी ‘कॉल’ जातो. दोन दिवसांपूर्वी कॉल दिल्यानंतरही शासकीय दंत रुग्णालयातील डॉक्टर मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक १७ मधील त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी आला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. (government dental college doctor not attend patients of teeth related problem in nagpur)

black fungus
चंद्रपूरची दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अयशस्वी? डॉ. अभय बंग यांचा प्रश्न

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, नियमबाह्य पद्धतीने शासकीय दंत रुग्णालयातील सेवा देण्याचे वेळापत्रक तयार केले असल्याचे उघड झाले. मेडिकलमध्ये दातदुखीच्या वेदना सहन करत असलेल्या त्या रुग्णाचे नाव राजेश अमृतकर असे आहे. वॉर्ड १७ मध्ये ते दाखल आहेत. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची गर्दी वाढत असताना शासकीय दंत रुग्णालयाच्या डॉक्टरांना मंगळवारी (ता.२५) दातांच्या तपासणीसाठी कॉल पाठवण्यात आला. मात्र डॉक्टर आले नाही, अशी तक्रार नातेवाइकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे केली. डॉ. गावंडे यांनी संबंधित वॉर्ड प्रमुख असलेल्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि उपचार मिळवून देण्यासाठी सूचना केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विविध विभागांतील डॉक्टरांनी आपसात नियमबाह्यरीत्या नियोजन करत काही वेळ सकाळी अर्धवेळ सेवा देण्यासाठी येतात. तर काही डॉक्टर दुपारी सेवा देण्यासाठी येतात. हा प्रकार प्रशासनाला माहिती आहे. मात्र कोणताही प्रतिबंध करण्यात आला नाही. येथील निवासी डॉक्टर मात्र इमानेइतबारे सेवा देत आहेत.

काही जण परस्पर अर्धवेळ सेवा देत पुर्णवेळेचे वेतन घेतात. हा नियमबाह्य प्रकार आहे. या प्रकरणाची वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने तसेच दंतचे सहसंचालक यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.
-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी सघटना, नागपूर.
दंत महाविद्यालयातील डॉक्टर अर्धवेळ सेवा देत असल्याचे अद्याप लक्षात आले नाही. कोरोना काळात रुग्ण कमी असल्याने कुणा डॉक्टरला काम असल्यास विलंबाने येणे अथवा लवकर जाण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
- डॉ. मंगेश फडनाईक, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com