cm devendra fadnavis
sakal
नागपूर - एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने सविस्तर बैठक घेऊन सर्व बाबींवर सकारात्मक चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून, परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांना जेरबंद केले आहे. भविष्यातही अशा प्रकारांना पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिला.