
नागपूर : माफसू विद्यापीठ संशोधन आणि विकासात अग्रेसर आहे. स्वदेशी गोवंशाच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी माफसूद्वारे उपयोग होत असलेले इन विट्रो फर्टिलाइजेशन (आईवीएफ) आणि भ्रूण प्रत्यारोपण (ईटीटी) या तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडतील, असा विश्वास राज्याचे राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.