

नागपूर : विद्यापीठांमध्ये वेळेत परीक्षा आणि निकाल लावण्याची समस्या मोठी आहे. त्यामुळे आता राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी थेट परीक्षा आणि निकालांच्या तारखा अगोदर जाहीर करण्याच्या सूचना केल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठाच्या शुक्रवारी (ता.१४) घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.