गृहिणींनो, इंधन वाढल्याने महागाईचा भडका; तूरडाळ, हरभरा डाळ, खाद्य तेल, साखरेचे दर वाढले

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613313629466,"A":[{"A?":"I","A":34.6710049256308,"B":816.273252106119,"D":125.81002711127884,"C":38.657990148738406,"a":{"B":{"A":{"A":"MAEV5-nOqQ8","B":1},"B"
{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613313629466,"A":[{"A?":"I","A":34.6710049256308,"B":816.273252106119,"D":125.81002711127884,"C":38.657990148738406,"a":{"B":{"A":{"A":"MAEV5-nOqQ8","B":1},"B"

नागपूर ः महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना दररोज इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. डिझेलचे भाव हळूहळू वाढू लागल्याने माल वाहतूकदारांच्या दरातही दहा ते १२ टक्के वाढ झालेली आहे. त्यामुळे भाज्या आणि डाळीनंतर साखर, खाद्य तेलाच्या किमती वाढत आहे. महागाई आपले रंग उधळत असताना लोक सहनशील झाले असल्याचे दिसत आहे. मात्र, वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना जगणेही महाग झाले आहे.

खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून कच्चा मालाचेही भावही वाढले आहे. टाळेबंदीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. काहींचे पगारही कमी झालेत, बॅंकेच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या दरातही घसरण झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दररोजचा खर्चही भागवणे कठीण झालेले आहे. ज्येष्ठ नागरिकांना तर स्वतःच्या औषधींचा खर्चही परवडेनासा झालेला आहे. त्यामुळे मजुरांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वंच जण वाढलेल्या भाववाढीने हवालदिल झाले आहेत.

खाद्य तेलाच्या दरात गेल्यावर्षीपेक्षा यंदा १९ टक्के वाढ झालेली आहे. तेलबियांच्या उत्पादनाचा देशात तुटवडा आहे. त्यामुळे तेलबियांची आयात वाढविण्यात आलेली आहे. पर्यायाने खाद्य तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. एक किलो सोयाबीन तेलासाठी १२५ ते १३० रुपये मोजले लागत आहे. सूर्यफूल तेलाची किंमत १३०, शेंगदाण्याचे तेल १५२ रुपयांवर पोहोचले आहे.

तूर डाळीचे दर गेल्या महिन्याभरापूर्वी ६० ते ६५ रुपये प्रति किलो होत्या. अचानकच मोठ्या कंपन्यांनी साठवणुकीसाठी तुरीची खरेदी करण्यास सुरवात केली. त्यामुळे तुरीचे भाव ७४ ते ७५ रुपये किलोवर पोहोचल्या. परिणामी, तूरडाळीचे भाव प्रति किलो १०२ ते १०३ रुपयावर गेली आहे. ही स्थिती अशीच राहिल्या येत्या काही दिवसात तूरडाळ १२० रुपये किलोवर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. चणा डाळीचे उत्पादन कमी असल्याने यंदा त्या डाळीतही भाववाढ झालेली आहे. 

अद्याप नवीन चणा बाजारात येण्यास थोडा कालावधी असला तरी त्याडाळीचीही साठवणूक होण्याची शक्यता असल्याने भाव घसरण्याची शक्यता कमी आहे. साखरेचा कोटा तीन लाख टनाने कमी केल्याने साखरेच्या दरातही प्रति किलो ५० पैसे वाढ झालेली आहे. तांदुळाचे उत्पादन कमी असल्याने वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहे. मार्च महिन्यात नोकरदारांच्या पगारातून प्राप्तिकराची कपात होत असल्याने बाजारातील ग्राहकी कमी झालेली आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहकांची वर्दळ मंदावली असून मालाची मागणीही कमी आहे असे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

उद्योजकही अडचणीत

लोखंड, प्लास्टिक आणि रसायनासारख्या कच्चा मालाचे भाव वाढल्याने उद्योजकही अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे काही उद्योजकांनी उत्पादन कमी केले तर काहींनी बंद केलेले आहेत. त्यासोबतच यामुळे बांधकाम व्यावसायिकही अडचणीत सापडले आहे. त्यांनीही आंदोलन केले होते.

ज्वारी ५० रुपयांवर

गरिबाचे अन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीने आता श्रीमंतांचा समजल्या जाणाऱ्या गव्हालाही मागे टाकले आहे. शास्त्रीयदृष्ट्या ज्वारीचे खूपच महत्त्व असून, हृदयरोग, मधुमेह आणि स्थूलता टाळण्यासाठी ज्वारी खाण्याकडे कल आहे. यामुळे ज्वारीची मागणी वाढल्याने तिचे दरही वाढले आहेत. ज्वारी सध्या ५६ रुपये किलोने विक्री होत आहे.

पेट्रोल-डिझेलची शतकाकडे वाटचाल

गेल्या सहा दिवसापासून इंधनाच्या दरात सतत वाढ होत असून लवकरच शतकी गाठणार असल्याचे बोलले जात आहे. आज शहरात पेट्रोल --- डिझेल -- प्रति लिटर पोहोचले आहे. पूर्वी जे नेते बैलगाडीने मोर्चे काढून लक्ष वेधत होते. तेच आता सत्तेवर आल्यानंतर यावर नियंत्रण का मिळवू शकत नाही असा सवाल अनेक ग्राहकांकडून उपस्थित केल्या जात आहे.

गॅस सिलिंडरच्या किमती आवाक्याबाहेर

सहा वर्षापूर्वी गॅस सिलिंडर ३२५ ते ३५० रुपयात मिळत होते. त्यानंतर अनुदानाचे सूत्र आले. किमतीही त्याच पद्धतीने घसरत असल्याने सांगण्यात येत होते. मात्र, आता अनुदान सिलिंडरसाठी ७७१ रुपये मोजावे लागत आहे. ही विक्रमी भाववाढ आहे. यापोटी ग्राहकांना फक्त ४० ते ५० रुपये अनुदान देण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com