Grampanchayat Election : रामटेक तालुक्यात दिवाळी पूर्वीच धुमधडाका

२८ ग्रामपंचायतींमध्‍ये रणधुमाळी पुढारी व कार्यकर्ते लागले कामाला
election
election sakal

शितलवाडी - राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यांतर्गत रामटेक तालुक्यातील २८ गावांत निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राजकीय रणधुमाळी व आतषबाजी अनुभवायला मिळणार आहे.

तालुक्यातील २८ ग्रामपंचायतच्या निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी होणार असून याची अधिसूचना ३ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली. यासाठी तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून राजकीय नेतेही कामाला लागले आहेत. सरपंचपदासाठी अनेक जणांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्‍यास सुरवातही केली आहे.

मागील काही काळापासून ग्रामपंचायती स्वावलंबी झाल्या आहेत. १५ व्या वित्त आयोगासह विविध विकास निधी गावांच्या लोकसंख्येच्या पटीत मंत्रालयस्तरावरून सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यांवर जमा होत आहे. आमदार, खासदार यांच्या निधीसह केंद्र व राज्य सरकारच्या विविध राष्ट्रीय योजना,

election
Mumbai News : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ; कोणते मंत्री येणार अडचणीत ?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा योजना, कृषी विभागांच्या अनेक वैयक्तिक योजना राबविणे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा निधी यासह इतर योजनेतून गावात काम करण्यासाठी ग्रामपंचायत ही एकमेव एजन्सी म्हणून कार्य करते.

यासाठी प्रमुख म्हणून सरपंचपदाला महत्त्व आहे. त्यातच यंदा सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढवितानाच आता सरपंचपदावर डोळा ठेवूनच निवडणूक लढविण्यात येत आहे. यासाठी निवडणुकीसाठी पॅनलची रचना करण्याची तयारी सुरू आहे.

election
Solapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोहोळ तालुक्यासाठी अडीच कोटीचा निधी मंजुर जिल्हाप्रमुख चवरे यांची माहिती

त्याचबरोबर सरपंच झाल्यानंतर इतर ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य मिळत राहावे, या हेतूने जवळच्या विश्वासू उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे.

विविध पक्षांच्या वरिष्ठ नेतेही मंत्रालय स्तरावरून मोठा विकासनिधी गावात आणल्यानंतर निधीचा चांगला विनियोग करण्यासाठी चांगला सरपंच असवा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने गावात सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांची निवड करून पॅनेलची रचना करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. एकंदरीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे.

भिवापूर तालुक्यात ३६ ग्रा.पं.च्या निवडणुका

भिवापूर : तालुक्यात होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी(३ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आला आहे. गावची विधानसभा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतवर कब्जा करण्यासाठी विविध पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. येत्या ५ नोव्हेंबरला मतदान व ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

election
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

१६ आक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर गोसेखुर्द पुनर्वसित मरुपार येथे चार तर पांजरेपार येथे तीन सदस्य पदाकरिता पोट निवडणूक होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीत कुणीही अर्ज दाखल केले नव्हते. त्यामुळे येथील सदस्य पद रिक्त आहेत.

थेट सरपंचामुळे मोर्चेबांधणीला वेग

सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यामुळे ग्रा.पं.वर आपले पक्ष समर्थित सरपंच व पॅनेल निवडून यावे यासाठी आमदार, जि.प., पं.स. सदस्य व नेत्यांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. गेल्या वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली असून राजकीय लोक कामाला लागले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होताच तालुक्यातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचपदासाठी अनेकजण सरसावले आहेत. मात्र निवडणुकीला खर्च येणार असल्याने अनेकांच्या मनाची द्विधा स्थिती झालेली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्याकरिता गावागावातील इच्छुक उमेदवार निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत मतदाराशी चर्चा करून चाचपणी करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com