Ram Navami : जय श्रीराम’च्या गजराने नागपूर ‘राममय’, पोद्दारेश्‍वर मंदिर व रामनगर येथील शोभायात्रांमुळे नागपूरकर भारावले

Festive Celebration : रामजन्मोत्सवानिमित्त नागपूर शहरात रामनवमी शोभायात्रा उत्साहात पार पडली, ज्यामध्ये लाखो भक्तांनी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
Ram Navami
Ram Navami Sakal
Updated on

नागपूर : भगवान श्रीरामाच्या वेशभूषेतील लोभस चिमुकले.. मन प्रसन्न करणारी आरास.. रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी सज्ज भक्तगण... अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिकृती अन्‌ रामनामाचा जयघोष अशा भक्तीमय वातावरणात उपराजधानीत शोभायात्रेला रविवारी दुपारी प्रारंभ झाला. रामजन्मोत्सवानिमित्त शहरातील ऐतिहासिक पोद्दारेश्‍वर राम मंदिर आणि रामनगर येथील मंदिरातून निघालेल्या शोभायात्रांमधील सहभागींच्या उत्साहाने अवघी संत्रानगरी‘राममय’ झाली होती. दरम्यान धार्मिक व सामाजिक संस्थांकडून ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांना महाप्रसाद, शरबत व खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले. शोभायात्रा पाहण्यासाठी जमलेल्या लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com