Nagpur Accident : मालवाहू वाहनाखाली दबून आजीसह नातवाचा मृत्यू ; लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीतून परत येत होते
Nagpur News : गिट्टीखदान भागात नवीन काटोल नाक्याजवळ लग्नाचा वाढदिवस साजरा करून परत येत असताना मालवाहू वाहन उलटल्याने त्याखाली दबून आजी आणि नातवाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर : गिट्टीखदान भागात नवीन काटोल नाक्याजवळ लग्नाचा वाढदिवस साजरा करून परत येत असताना मालवाहू वाहन उलटल्याने त्याखाली दबून आजी आणि नातवाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.१६) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली.