आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुदान; ३.१९ कोटींचा निधी प्राप्त

नागपूर : शासनाकडून ३.१९ कोटींचा निधी प्राप्त; लवकरच वितरण
Grants interracial marriages 3 crore 19 lakh fund nagpur
Grants interracial marriages 3 crore 19 lakh fund nagpursakal

नागपूर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रोत्साहनपर ५० हजारांचे अनुदान देण्यात येते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून योजनेचे अनुदान अडकले होते. परिणामी ८५० वर जोडपे अनुदानापासून वंचित होते. परंतु आता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे शासनाकडून ३ कोटी १९ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच या पात्र लाभार्थींना अनुदान मिळणार आहे.

महाराष्ट्र पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाते. समाजातील जातीची बंधने तोडण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी काम केले. समाजाने ती अजूनही आत्मसात केली नसली तरी प्रेमसंबंधांतून का होईना या संकल्पनेला चालना मिळत आहे. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून शासनाकडूनही आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाते. यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून निधीत पन्नास टक्के असा हिस्सा दिल्या जातो. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे दरवर्षी सुमारे साडे चारशेवर जोडप्यांकडून अर्ज सादर करण्यात येते. परंतु अनेकदा शासनाकडून निधीची तरतूद होत नसल्याने अनेकांना सानुग्रह अनुदानासाठी प्रतिक्षा करावी लागते. तर कधी शासनाकडून मोजकाच निधी मिळत असल्याने अनेक पात्र अर्जदारांनाही प्रतीक्षा करावी लागते.

विभागाने वर्ष २०१९-२० मध्ये या योजनेचा ३७६ जोडप्यांना लाभ मिळाला. २०२०-२१ मध्ये ४७२ जोडप्यांना लाभ मिळाला. तेव्हापासून आजतागायत विभागाकडे ८५० वर जोडप्यांचे अर्ज हे अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. परंतु आता नुकतेच शासनाकडून या जोडप्यांच्या अनुदानापोटी ३ कोटी १९ लक्ष रुपये विभागाला प्राप्त झाले आहे. त्यातून पन्नास हजार रुपये प्रती जोडप्यांप्रमाणे ६३८ जोडप्यांना हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. उर्वरित जोडप्यांना निधीची तरतूद उपलब्ध होताच लाभ दिला जाईल, असे जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी सांगितले.

शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. शासनाच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना निधी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

- किशोर भोयर, समाज कल्याण अधिकारी, जि.प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com