
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील एमएससीच्या १२ विद्यार्थ्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एकूण १६ पेटंट मिळविले आहे. इतिहासात प्रथमच या विभागातील एम.एससी.च्या विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली. संशोधन कार्यासाठी उत्साहित करून व त्यांच्याकडून पेटंटचे कार्य करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविण्यात डॉ. संजय ढोबळे यांना यश आले आहे.