esakal | भाजीचे भाव स्थिरावले असतानाच हिरवी मिरची, टोमॅटो दहा रुपयांनी स्वस्त

बोलून बातमी शोधा

Green chillies tomatoes cheaper by ten rupees

भाजीचे भाव स्थिरावलेले आहेत. गेल्या आठवड्यापासून भाजीच्या गाड्यांची आवकही ५० टक्क्यांवर आलेली आहे. सध्या गाड्यांची आवक ८० वर आली आहे. त्यामुळेच भाव स्थिरावलेले आहेत, असे राम महाजन म्हणाले. 

भाजीचे भाव स्थिरावले असतानाच हिरवी मिरची, टोमॅटो दहा रुपयांनी स्वस्त
sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवारी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यापार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कळमना आणि महात्मा फुले मार्केटमध्ये भाजीची आवक घटलेली असताना ग्राहकांची वर्दळही कमी झालेली आहे. परिणामी, भाजीचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावले आहेत. मात्र, टोमॅटो, हिरवी मिरचीच्या भावात प्रति किलो दहा रुपयाची घसरण झाली आहे.

उन्ह वाढू लागली असून स्थानिक शेतकऱ्यांकडून येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झालेली आहे. दरम्यान, प्रशासनाने दोन दिवसांचा बंद पुकारल्याने ग्राहकांची बाजारातील वर्दळ कमी झालेली आहे. परिणामी वाढलेल्या स्थितीत भाजीचे भाव स्थिरावलेले आहेत. गेल्या आठवड्यापासून भाजीच्या गाड्यांची आवकही ५० टक्क्यांवर आलेली आहे. सध्या गाड्यांची आवक ८० वर आली आहे. त्यामुळेच भाव स्थिरावलेले आहेत, असे राम महाजन म्हणाले. 

भाजीपाला दर (रुपये प्रतिकिलो) 
वांगे १० 
टोमॅटो १० 
फुलकोबी १०
पानकोबी ०८ 
चवळीच्या शेंगा ४० 
कारले ५० 
गवार शेंगा ४० 
पालक १० 
मेथीची भाजी १२ 
कोहळा १५ 
शिमला मिरची ४० 
कोथिंबीर २० 
भेंडी ३० 
दुधी भोपळा १५ 
काकडी १० 
मुळा १० 
गाजर २० 
हिरवी मिरची १०