नागपूर : ग्रामीण भागात शासनाचे दूत म्हणून तलाठी व ग्रामसेवकाकडे पाहिले जाते. ही जबाबदारी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आता प्रत्येक महिन्यात तिसरा व चौथा बुधवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी समाधान दिवस म्हणून राबविण्यात येईल. .या दिवशी गावांसाठी असलेल्या साजाच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक व गावपातळीवरील शासकीय कर्मचारी प्रत्येक नागरिकांच्या तक्रारीचे समाधान गावातच करतील. जे शक्य होणारी कामे आहेत ती तत्काळ मार्गी लावतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले..जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यशाळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा परिषद व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत मिळाले पाहिजे यासाठी शासन दक्ष आहे. पाणंद रस्ते याबाबत वर्षोनिवर्ष सुरु असलेले वाद समोपचाराने तत्काळ मार्गी निघू शकतात..Yavatmal News : शेतकरी मेल्यावरच मदत मिळणार का? – वर्षभरापासून मदतनिधीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा आक्रोश!.या सर्व योजनांसाठी शासनातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्याप्रती गंभीर असलेच पाहिजे. तलाठी ग्रामसेवक यांच्या गावपातळीवर उपस्थितीबाबत लवकरच एक परिपत्रक निर्गमित करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री धरती आबा योजना, वनपट्टे यासारख्या आदिवासी विभागाच्या योजनांना अधिक गती देण्याचे त्यांनी सांगितले..उत्तम प्रशासनाच्या मानकामध्ये गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक यांची कर्तव्य तत्परता ही अत्यंत महत्वाची असते. पाणंद रस्ते, फेरफार, पिककर्ज, संजय गांधी निराधार योजना व इतर निवडक योजना या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व तत्पर झाल्यास नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, असे डॉ. विपीन इटनकर म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.