dr. rajabhau tanksale with ajit pawar
sakal
नागपूर - वर्धा जिल्ह्यात महापूर आला होता. हिंगणगाव तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. चानकी गावात एका झोपडीत पूर्ण पाणी शिरले होते. अन्नधान्य वाहून गेले होते. एक म्हातारी खाटेवर असहाय्य अवस्थेत पडली होती.
दादांनी स्वतः चिखलात उतरून त्या आजीचा हात धरून तिला बाहेर आणले. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण गावासाठी जेवणाची व्यवस्था केली. ‘त्या’ क्षणी दादा गावकऱ्यांसाठी देवदूत ठरले.