
नागपूर - मजुरीसाठी मध्यप्रदेशातून विदर्भात आलेल्या मजूर महिलेचा अपघात झाला. यात जखमी होऊन मेंदूपेशी (ब्रेन डेड) मृत झाल्याने तिच्या यकृत आणि किडनी दानातून दोन पुरुषांना नवजीवन मिळाले. मजुरी करणाऱ्या कुटुंबीयाने अवयवदानाचे महत्त्व जाणून महिलेच्या मृत्यूनंतर अवयव दान करीत समाजासमोर आदर्श ठेवला.