Nagpur Monsoon : उपराजधानी नागपूरमध्ये मान्सून दाखल होऊन तीन दिवस झाले, तरीही पावसाचा पत्ता नाही. ढग येतात पण पाऊस नाही. बळीराजा आणि नागपूरकर दोघेही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
नागपूर : उपराजधानीत मॉन्सून दाखल होऊन तीन दिवस झालेत मात्र पाऊस सतत नागपूरकरांना हुलकावणी देत आहे. वरुणराजा नागपूरचा पत्ता तर विसरला नाही ना? असा प्रश्न नागरिकांच्या मनात घर करीत आहे.