Nagpur News : आधी झाडे लावा नंतरच वृक्षतोड; उच्च न्यायालयाचे आदेश, विकास प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पर्यायी वृक्षारोपण
Tree Cutting Ban : विकास प्रकल्पांसाठी वृक्षतोड करण्यापूर्वी पर्यायी वृक्षलागवड करणे आता बंधनकारक ठरणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा ऐतिहासिक आदेश दिला असून मनपाला तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर : विकास प्रकल्पांसाठी वृक्षतोड करण्यापूर्वी पर्यायी वृक्षलागवड करणे बंधनकारक असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. हा नियम सर्व सार्वजनिक आणि खासगी प्रकल्पांना लागू होईल.