
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निर्णय देताना प्रणय राजेंद्र घरडे (३०) यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द केला. पीडित महिलेचे यापूर्वीच लग्न झाले असल्याने आरोपीने लग्नाचे आमिष दिले आणि बलात्कार केला, असे म्हणता येणार नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने या निकालात नोंदविले.