HCBA Nagpur Election 2025: यंदाच्या एचसीबीए निवडणुकीत महिलांना आरक्षण देणे अशक्य; संघटनेचे महिला वकिलांना उत्तर
Women Reservation Demand: नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीत महिलांना ३० टक्के आरक्षणाची मागणी; परंतु तांत्रिक कारणास्तव नकार. ‘वन बार वन वोट’ धोरण आणि महिला प्रतिनिधित्वाबाबत न्यायालयात आज झाली सुनावणी.
नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन, नागपूरच्या (एचसीबीए) महिला सदस्य वकिलांनी २०२६-२०२९ या कार्यकाळासाठी होणाऱ्या संघटनेच्या निवडणुकीत महिलांसाठी ३० टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे.