...अन्‌ "तो' महिनाभराने "निगेटीव्ह' होउनच घरी परतला, वाचा सविस्तर...

file
file
Updated on

कन्हान (जि.नागपूर) :  लोहिया लेआउट रामनगर कन्हान येथील 61 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरा होऊन घरी परतला. त्याच्या घरातील सदस्यांसह सर्वांना त्याच्या राहत्या घरी होमक्वोरंटाइन करण्यात आले आहे.


मुलीच्या सासऱ्याच्या अंत्यविधीला गेला होता आग्य्राला
मुलीच्या सासऱ्याचा आग्रा येथे अंत्यसंस्कार करून 17 मार्चला कन्हानला आलेल्या एक व दिल्लीवरून दोन असे तिघांना प्रशासनाने 1 एप्रिल रोजी नागपूरला नेऊन तपासणी केली. 2 एप्रिल रोजी निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने तिघांना रविभवन नागपूर येथे क्‍वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. 14 दिवसांनी तिसऱ्या तपासणीत आग्य्रावरून आलेला लोहिया लेआउटचा वृद्ध पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व पोलिसांनी कन्हान येथील त्याचे राहते घर गाठून त्याची पत्नी, मुलगा व सहवासातील दहा सदस्यांना रविभवन येथे क्‍वारंटाइन करण्यात आले होते. लोहिया लेआउट रामनगर परिसर पूर्णत: लॉकडाउन करण्यात आला. रुग्णाच्या संपर्कातील त्याची पत्नी व मुलासह दहा सदस्य निगेटिव्ह असल्याने पाच, पाच करून दहाही सदस्यांना घरी पाठविण्यात आले. सोमवारी दुपारी 2 वाजा पॉझिटिव्ह रुग्ण उपचारात दुरुस्त झाल्याने त्यालासुद्धा कन्हान येथील घरी आणले. या रुग्णासह दहाही सदस्यांना त्याच्या घरीच होमक्वारंटाइन करण्यात आले आहे.
 
सविस्तर वाचा  : दमाग्रस्तांना कोरोना संसर्गाची जोखीम; अशी घ्या काळजी

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले दिशानिर्देश
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कन्हान नगर परिषद येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना दक्षतेबाबत दिशानिर्देश करून कन्हान शहरात यापुढे कुठलाही पॉझिटिव्ह रुग्ण होऊ नये, म्हणून सर्वांनी दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाद्वारे तीन दिवसांत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करूनच योग्य कार्यवाही अमलात आणावी,अशा सूचना दिल्या. याप्रसंगी पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार, कन्हान वैद्यकीय अधिकारी योगेश चौधरी, नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

NMC MBBS Admission
NMRDA Land Acquisition
Nagpur Police arrested two women after a 'Luteri Dulhan' gang allegedly duped a Gujarat man of ₹70,000 and gold ornaments on the pretext of marriage.
Nagpur Loan waiver
Marathi News Esakal
www.esakal.com