नागपुरात कोरोनासाठीच्या व्यवस्थेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे नाराज; मेडिकलमध्ये ४०० खाटा वाढवण्याचे टोपे यांचे निर्देश

health minister Rajesh tope disappointed on system in nagpur against corona
health minister Rajesh tope disappointed on system in nagpur against corona

नागपूर : मेडिकलमध्ये कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या खाटांच्या संख्येवर नाराजी व्यक्त करीत खाटांची संख्या ४०० ने वाढविण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रशासनाला दिले.

कोरोनाबाबतचा आढावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, विभागीय आयुक्त संजीवकुमार, मनपा आयुक्त राधाकृष्ण बालसुब्रमण्यम, मेडिकल, मेयोचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत त्यांनी एकूणच शहरातील आरोग्य व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. 

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मेडिकलमध्ये १ हजार ७०० खाटा असून कोरोना रुग्णांसाठी फक्त ६०० खाटाच आहेत. ही संख्या कमी आहे. किमान हजार खाटा असणे आवश्यक आहेत. त्यामुळे ४०० खाटा वाढविण्‍याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा मृत्यूदर कमी करणे गरजेचे आहे. रुग्णाला वेळीच ऑक्सिजन, रुग्णवाहिका मिळायला हवी. शहरात ॲंटीजेन चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. त्यापेक्षा आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जादा बिलाची आकारणी झाल्याची तक्रार आल्यास योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या व्यवस्थापनावरही नाराजी

कोरोनासाठी सर्वांनी सेवा दिली पाहिजे. येथील डॉक्टर सात दिवस सेवा दिल्यानंतर सात दिवस गृह विलगीकरणात असतात. यामुळे कामावर परिणाम होतो. इतर ठिकाणी असे नाही. सात दिवस कोरोना वॉर्डात काम केल्यानंतर एक दिवस सुटी दिली पाहिजे. त्यानंतर सात दिवस बिगर कोरोना वॉर्डात सेवा दिली पाहिजे. पुन्हा एक दिवसाच्या सुटी नंतर कोरोना वॉर्डात सेवा देणे आवश्यक. अशा प्रकारची ड्यूटी लावण्याचे निर्देश मेडिकल प्रशासनाला त्यांनी दिले.

डॅशबोर्ड अधिक सक्षम हवा

येथील डॅशबोर्ड व्यवस्थेवरही राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णांना वेळेत ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणि खाट मिळणे आवश्यक आहे. आपल्याकडे किती ऑक्सिजन आहे, रुग्णवाहिकांची स्थिती काय आहे याची अद्ययावत माहिती असली पाहिजे. यासाठी डॅशबोर्ड अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या करता दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास त्यांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com