नागपूर : कंत्राटी डॉक्टरांच्या भरवशावर कामगारांचे आरोग्य

राज्य कामगार योजना सोसायटीला मिळतात दरवर्षी १५०० कोटी
Health of workers relying on contract doctors State Workers Scheme nagpur
Health of workers relying on contract doctors State Workers Scheme nagpur sakal

नागपूर : राज्यातील कामगारांना वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेचे रूपांतर सोसायटीमध्ये झाले. सोसायटीत तयार होऊन तीन वर्षे लोटली. दरवर्षी महामंडळाकडून १५०० कोटीचा निधी महाराष्ट्र राज्य कामगार योजना सोसायटीत जमा होतो, मात्र राज्यातील कामगार रुग्णालयांचा गुणात्मक दर्जा सुधारण्यात आला नाही. तर कंत्राटी डॉक्टरांच्या भरवशावर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य अवलंबून आहे.

सोसायटीची स्थापना झाल्यामुळे महत्त्वाचे निर्णय जलदगतीने घेणे शक्य होईल. तसेच राज्य कामगार विमा महामंडळाकडून दरवर्षी देण्यात येणारा सुमारे पंधराशे कोटी रुपयांच्या निधीतून रुग्णालय तसेच निवासी इमारतींची दुरुस्ती देखभाल, आधुनिक वैद्यकीय उपचार, उपकरणांची उपलब्धता रुग्णालयामध्ये होईल अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र डायलिसिस, रेडिओ डायग्नोस्टिक्स, कॅथ लॅब, कॅन्सरवरील उपचारासह आयसीयू व एनआयसी युनिटसची सुविधा या दवाखान्यांमध्ये तीन वर्षांत उभारणे सोसायटीला शक्य झाले नाही.

सोसायटीमार्फत राज्यात १२ राज्य कामगार रुग्णालये आहेत. ६२ च्या वर राज्य कामगार विमा योजनेची सेवा दवाखाने आहेत, मात्र या रुग्णालयातील उपचाराचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत नसल्याचे दिसून येते. राज्य कामगार विमा योजना अस्तित्वात असताना जो कंत्राटी नियुक्तीचा कॅन्सर रुग्णालयांना जडला होता,तीच री ओढण्याचा प्रकार सोसायटी मार्फत होत आहे. राज्यात १२ कामगार रुग्णालयांमध्ये सुमारे १ हजार डॉक्टर कामगार रुग्णालयांच्या सेवेसाठी कर्तव्यावर आहेत, मात्र यातील ७० टक्के डॉक्टर कंत्राटीवर नियुक्त करण्यात आले आहेत. तर १५ टक्के बंधपत्रिता (प्रशिक्षणार्थी अर्थात बाऊंडेड डॉक्टर) चा समावेश आहे.

२४ लाख कामगार

सोसायटीच्या स्थापनेनंतरही राज्यातील २४ लाख कर्मचारी व ४५ लाख राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत असलेल्या विमा धारकांना गुणात्मक दर्जेदार उपचार राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात उपलब्ध होत नाही. सोसायटीच्या माध्यमातून राज्यातील सर्वच कामगार रुग्णालये आणि डिस्पेंसरीतील उपचाराचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. मात्र कंत्राटी डॉक्‍टर आणि बंधपत्रित डॉक्टरांच्या भरवशावर रुग्णसेवा सुरू आहे. अत्याधुनिक यंत्र का खरेदी केली जात नाही. खरेदी केली तरी ती कंत्राटी डॉक्टरांच्या हातात आहेत. खासगीत रेफर केल्यानंतर वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती तत्काळ मिळत नाही, अशी तक्रार वंचित बहुजनच्या आयटी सेलचे प्रमुख सिद्धांत पाटील म्हणाले.

कामगार रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर

कायम डॉक्टर - ११

बंधपत्रित डॉक्टर - ११

कंत्राटीवर नियुक्त डॉक्टर - ३१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com