
कोदामेंढी (मौदा) : बोरी (घिवारी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौदा वर्षे सेवा दिल्यानंतर विजश्री सदानंद मेश्राम यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शाळेत पार पडला. विद्यार्थ्याप्रती त्यांचे असलेले प्रेम आणि निरोप देतेवेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रृ पाहून सारेच भावूक झाले.