नागपूर - उपराजधानीत उष्णतेची लाट सुरू आहे. नुकतेच उपराजधानीत २३० व्यक्तींवर उष्णतेचा परिणाम झाला असून उष्माघातासह उकाड्यामुळे अंगावर पुरळ येण्यापासून तर उष्णतेचा दाह आणि उष्णतेमुळे अस्वस्थ झालेले रुग्ण आढळले आहेत. .उपराजधानीत उकाड्यामुळे सर्वच वयोगटातील अनेक नागरिकांमध्ये ताप, ओकारी, अपचनासह उष्माघाताशी संबंधित तसेच उष्णतेचे त्रास वाढले आहेत. मेडिकल, मेयो, डागासह महापालिकेचे रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांत या रुग्णांची संख्या वाढत आहे. उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करणे सर्व रुग्णालयांना बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने उष्णतेचा त्रास असलेल्या २३० व्यक्तींची नोंद केली आहे..शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका, उष्ण वातावरणात घराबाहेर पड नका, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. उष्णतेचा त्रास बहुतांश शेतकरी, बांधकाम मजूर, वाहनचालक, पोलिस, सफाई कर्मचारी, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना झाल्याचे दिसून येते..असे आढळले आहेत उष्णतेचे रुग्ण१ - उष्माघात५२ - उष्णतेमुळे पुरळ७२ - उष्णतेमुळे पेटके१०५ - थकवा .असा होतो उष्णतेचा त्रासअस्वस्थपणानीट चालता न येणेभोवळ येणेभ्रमिष्टपणाकधीकधी झटका येणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.