Nagpur News: नागपूर जिल्ह्यात सलग ६० तास पडलेल्या पावसामुळे ६,८६१ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. ३६१ गावांतील ८,८८६ शेतकरी संकटात; शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा.
नागपूर : सलग ६० तास अतिवृष्टीमुळे शहर आणि ग्रामीण भागात घरांचे, जनावरांचे तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाच्या प्राथमिक पंचनाम्याच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ३६१ गावांतील ६,८६१ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.