
नागपूर : गत ८ व ९ जुलैला नागपूर शहरासोबतच ग्रामीण भागात झालेल्या धुव्वाधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरामुळे चारशेवर घरांचे नुकसान झाले. हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. दोन जणांचा मृत्यू झाला. तर पाळीव जनावरे दगावली. शेकडो कोटींच्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. परंतु आठवडा लोटूनही पंचनामे रखडल्याने नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे.