esakal | नागपूरकरांची दाणादाण : वादळी पावसाने उपराजधानीला झोडपले; आज-उद्याही इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरकरांची दाणादाण : वादळी पावसाने उपराजधानीला झोडपले

नागपूरकरांची दाणादाण : वादळी पावसाने उपराजधानीला झोडपले

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : दिवसभर उन्हाचे चटके अन् सायंकाळी वादळी पाऊस (Heavy rain) असा विचित्र खेळ तीन दिवसांपासून उपराजधानीत सुरू आहे. मंगळवारीही मेघगर्जनेसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावून नागपूरकरांची दाणादाण उडविली. विदर्भात अवकाळीचा खेळ (Untimely game in Vidarbha) आणखी दोन दिवस सुरूच राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे (Regional Meteorological Department) म्हणणे आहे. (Heavy rains in Nagpur with torrential rains)

पश्चिमोत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा कहर सुरू असतानाच विदर्भातही अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसतो आहे. वादळाचे केंद्र सध्या नागपूर शहर बनले आहे. उपराजधानीला सलग तिसऱ्या दिवशी वादळाने जोरदार दणका दिला. दुपारी तीनपर्यंत ऊन तापल्यानंतर चारच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. अनेक भागांना जवळपास अर्धा ते एक तास विजांच्या कडकडाट व मेघगर्जननेसह वादळाने तडाखा दिला.

हेही वाचा: मोठी बातमी : तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करूण अंत

गोधनीपासून वर्धा रोडपर्यंत आणि बेस्यापासून हिंगण्यापर्यंत सगळीकडेच जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून बचावासाठी अनेकांना आडोशाचा आश्रय घ्यावा लागला. जागोजागी पाणी तुंबले होते. छत्र्या व रेनकोटही बाहेर पडले. काही ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला. शहरात बराच वेळपर्यंत सरींवर सरी सुरूच होत्या.

उकाड्यापासून दिलासा

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन ऊन व उकाड्यापासून दिलासा मिळाला. काटोल, कळमेश्वर, कामठीसह ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. विदर्भावर अवकाळी पावसाचे संकट आणखी दोन दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Heavy rains in Nagpur with torrential rains)