Nagpur Heavy Rain : जिल्ह्यात जोरदार पावसाची उसंडी; नदी नाले ओसंडले, नागरिकांच्या घरात पाणी शिरले
Monsoon Update : दहेगाव परिसरात तीन तासांच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले तुडुंब भरून पुलांवरून पाणी वाहू लागले असून, शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे.
कोदामेंढी (मौदा) : मागील पंधरा दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पावसाने अखेर दमदार हजेरी लावली. विशेषतः दहेगाव परिसरात बुधवारी सकाळपासून तब्बल तीन तास धुवांधार पावसाने हजेरी लावली.