Nagpur Rain : नागपूर शहरात विजांसह दमदार पाऊस; दिवसभर जाणवला उकाडा, पुढचे चार दिवस यलो अलर्ट
Weather Update Today : नागपूर व विदर्भात विजांसह पावसाने हजेरी लावली असून, पुढील चार दिवस हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसाचा उकाडा व सायंकाळच्या वादळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
नागपूर : दिवसा उन्हाचे चटके आणि सायंकाळी वादळवारा, असे वातावरण सध्या नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. मंगळवारपाठोपाठ बुधवारीही दिवसभर शहरात उन्हाचे सौम्य चटके जाणवले. मात्र सायंकाळ होताच सोसाट्याचे वादळ सुटले.